Dr. Vidya Kopikar

  • *पूर्वार्ध* *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* ,*पारिजातवृक्ष ,आणि मी*सालाबाद प्रमाणे याही वर्षी गोळा केलेल्या वीर सावरकर स्मृती पारिजातक बियां, पूजन करून 16 वीर सावरकर प्रेमी यांना पोस्टाने पाठवल्या. 🩷🙏1990 पासून साधारण चार -पांचशे लोकांकडे ह्या बिया पोहोचल्या असून वीर सावरकर स्मृती जागवण्याचे काम ते समाजात करत आहेत. राहिलेल्या बिया मी *एक झाड विठ्ठलाचे* या संकल्पनेस दिल्या आहेत .🙏🙏गेल्या वर्षी माझ्या एका मित्राने एक शंका काढली .म्हणें, डॉक्टर विद्या कोपीकर* *काहीच्या काय  बोलताहेत*!!!. 😳😳त्यांनी म्हणें प्रसिद्ध कलाकार,श्री शरद पोंक्षे ;वीर सावरकरांची नातवंड ;पणतवंड वगैरे वगैरेंची साक्ष काढली.😜म्हणें….वीर सावरकरांनीच पारिजात लावला त्याचा पुरावा काय??😳😳 आणि त्या सर्वांचं असंही म्हणणं पडलं कीं वीर सावरकरांनी असे काही पारिजातकाचे झाड लावलेलंच नाही !!!.म्हणे…. एक पिंपळ तेवढा आहे तेथे साक्षीला !!😳😳😳1989 मध्ये माझ्या मुलांच्या सब-ज्युनियर  नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धा मद्रास  (आताचे चेन्नई )येथे  झाल्या होत्या .तेथूनच आम्ही अंदमानला गेलो असतांना  वीर सावरकरांनी स्वहस्ते लावलेल्या ह्या पारिजात  झाडाने लक्ष वेधून घेतले.🙏🙏वीर सावरकरांच्या *काळकोठडीपासून निघून कोलूघरला*  ,पाय- रस्त्यावरून जातांना ते डावीकडे  होतं.🙏अत्यंत *सुंदर, हिरवं कंच, ठेंगणं- ठुसकं, कमालीचं तेजस्वी झाड* येतां-जातां प्रत्येकाच्या नजरेत भरत होतं.🙏येणा-जाणारा प्रत्येक गाईड त्या झाडास नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हता .माझ्यासाठी *त्यांची श्रद्धा हाच माझा भक्कम पुरावा*.बरें…..त्या झाडाची परवानगी मागून मला  आमच्या गाईडने चार बिया दिल्या . मुंबईत त्या चार बियांची आठ रोपं झाली .💪💪सकल बागप्रेमींचे म्हणणं आहे कीं *पारिजातच्या बियांची उगवण खूप कमी असते*.😢त्या अनुषंगाने माझ्या या 100%उगवणाऱ्या *विजिगीषु वीर सावरकर स्मृती बिया* हाच माझ्यासाठी भक्कम *श्रद्धेय  पुरावा ठरतो*.1990 पासून दरवर्षी साधारण दहा-वीस वीर सावरकर प्रेमींकडे  माझ्या पारिजातक बिया गेल्या आहेत.🙏त्यांतल्या कोणीही त्यांच्या उगवणी बद्दल अज्ञाप शंका सांगितली नाही.👍हा भक्कम *सावरकर प्रेमी लोकजनांचा पुरावा का कमी झाला*???💪💪💪💪*आतां  हल्लीचाच …अगदीं हल्लीचा इतिहास काय सांगतो ते पाहूया*🙏🙏 .(*ह्यांत डॉक्टर विद्या कोपीकरांनी   आपल्या पदरचं काही घुसडंलं नाही आहे हो!!)* 😉😉😉2004 मध्ये श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असतां, तेव्हाचे  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री .राम नाईक यांनी  वीर सावरकरांच्या  एका अजरामर कवितेची एक पंक्ती   स्वातंत्र्यज्योती फलकावर कोरली होती, *|| कि घेतले व्रत न हे आंम्ही अंधतेने||* 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर ,*श्री मणी शंकर*अय्यर* तेव्हाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी एक *मौखिक फतवाच* *काढला होता म्हणे.🤔त्यानुसार वीर सावरकरांचा फलक तर उखडून काढलाच, त्याचबरोबर वीर सावरकरांची प्रत्येक स्मृती पण नष्ट करावी हाच होता तो *मौखिक फतवा*.😢😢सावरकरांना ठेवलेल्या काळकोठडीच्या भिंतींचा व अगदी भिंतीच्या कानाकोपर्यांचाही  गिलावा छिन्नी-हातोडीने फोडून काढला गेला व सँड पेपरने त्या  ब्रह्मदेशीच्या छोट्या छोट्या विटा घासून काढल्या गेल्या .😡😡😡 वीर सावरकरांची भीतीच हीsss एवढी मोठ्ठी की, त्यांनी जे *कमला खंड काव्य* काळ-कोठडीच्या भिंतीवर विटांचे तुकडे,वनस्पतींचे काटे-कुटे  ह्यांनी लिहून काढले होते , त्यातील जरी एखादे अक्षर ; वेलांटी; अनुस्वार ;उदगार चिन्ह;  वगैरे राहिलेले दिसलें तर काय घ्या??😡😡मग त्या वीर सावरकरांच्या फलकाच्या जागी आपले सर्वांचे प्रिय राष्ट्रपिता ,श्री.मोहनदास करमचंद गांधींचा फलक लावला गेला. 🙏🙏अशी ही  *असुरी /अघोरी/ विध्वंसक* विचारसरणी फक्त आपल्या भारतातच दिसत नाही तर सर्व जगभर निरंतर काळापासून दिसून येते.. 😢😢असे  असतांना तो *क्षिरसागरोत्पन्न पारिजातक वृक्ष* कसा काय बरें तिथे जिवंत ठेवतील ?? चालवली असणार एक कुऱ्हाड त्या जिवंत सजीव सुंदर वृक्षावर 😡😡😡असें असतां आतां माझ्या मित्रास *पुरावा* हो कुठला देणार,???🤔🤔🤔तर असो, ……..कुणाही वीर सावरकरप्रेमींस *वीर सावरकर पारिजातक स्मृती बिया* हव्या असतील तर त्यांनी आपआपलें  नांव /पत्ता /(जमल्यास लखोटा पण दिल्यास बरे होईल) द्यावा.  त्यांना अत्यंत आस्थेने व आदराने पूजन केलेल्या बिया दिल्या जातील.🙏🙏🙏*सरशेवटी जेथे आस्था/भक्ती असतें तिथे पुरावा नाही मागितला जात*.🤫🤫ह्याच लेखाचा  उत्तरार्ध पुढल्या भागात.आपला जगाचा ज्ञात-लिखित इतिहास हा साधारण दोन अडीच हजार वर्षांचाच .😢त्या पूर्वीचा जो इतिहास आहे तो मौखिक पद्धतीने पालकांकडून मुलांकडे /गुरू-शिष्य परंपरा/लोकशाहीर /भाट /सुत-गण /कलाकार  वगैरें वगैरें कडून *मौखिक* पद्धतीने आपल्यापर्यंत आला.हा इतिहासही खूप रंजक रीतीने परंपरेनेसांगितला गेला आहे.(*रटाळपणें सांगितलेला इतिहास/गोष्टी  कोणास आवडतील??*)तेव्हा अशा परिस्थितीत खरा इतिहास प्रत्यक्षात काय घडला असावा हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते .आणि  खरा इतिहास जाणून ,नवीन इतिहास घडविणाऱ्यांतल्या   दोन व्यक्ती आपल्या समस्त भारतीयांचे दैवत आहेत. 🙏🙏त्यातले एक आहेत *द्वापरयुगातले  वासुदेव श्रीकृष्ण आणि दुसरे  श्री. छत्रपती शिवाजी महाराज* .ज्यांनी आपला *इतिहास व भूगोल*  आत्मसात करून कठीणातल्या कठीण प्रसंगावर कशी मात केली हे सांगणार आहे.तर पुढचा लेख *युगंधर श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी* *महाराज , क्षिरसागरोत्पन्न पारिजातक वृक्ष*.  व सरते-शेवटी मी*🩷🩷

  • मी व माझा पारिजातक

  • ँ *आज एक नवल घडलं खरं.*🩷🩷 माझ्या एका केरळच्या मित्राने चक्क विमानाने लाल आल्याचं पार्सल पाठवलं. 🫚🫚🫚🫚🫚✈️✈️✈️✈️फक्त चार कंद आहेत .तर ते मातीत लावणार; मायेने वाढवणार आणि सगळ्यांना वाटणार.🩷🩷🩷हे लाल आलं *थायलंड इंडोनेशिया मलेशिया* वगैरे प्रदेशाचे असून आपल्याकडेही याची लागवड होते. हवामान जरा थंड लागतं खरं.😉इंडोनेशियामध्ये ह्यास *Jahe Merah* ह्या नावाने ओळखलं जातं.ह्याच बोटॅनिकल नाव आहे *Zangiber Oifficinale ver rubrum”*.आपल्या साध्या भारतीय आल्यापेक्षा हे *भारी तिखट आणि  जरा उग्र वासाचं* असतं.🤭 त्याच्यामुळे जेवणातही वापरतात पण *थोडूसंच* वापरावं लागतं.😉ज्यांना आल्याचा उग्र वास आवडत नाही त्यांच्यासाठी मात्र हे आलं कामांचं नाही.🤫 ह्या लाल आल्याचा उपयोग औषधात मात्र खूप ठिकाणी होतो. आयुर्वेद ,युनानी , पारंपारिक वैद्य औषधी यांत हे लाल आलं खूप वापरलं जातं .*Essential oil* चं प्रमाण यांत खूपच जास्त असतं  (3.5% पर्यंत). साध्या आल्यात 1.2% ते 2% च्या वर  कधीही जात नाही.😳*जिंजीराॅल* घटक तर अगदीच जबरदस्त पणे वाढलेला. त्याच्यामुळे हे *अँटिईंफ्लेमेटरी ;* *अँटी मायक्रोबियल; अँटी कॅन्सरस;* *अँटिऑक्सिडंट ; अँटिओबेसिटी*  साठी खूप वापरतात.इंडोनेशियामध्ये ह्याचे *”Jamu” टॉनिक* ड्रिंक अत्यंत नावाजलेले आहे.सर्वात जास्त या लाल आल्याचा उपयोग पारंपारिक औषधीत  *कामोत्तेजक*(Aphrodisiac )*म्हणून केला जातो.आपल्या आयुर्वेदात मात्र ह्यास  *उष्ण वनस्पती* म्हणून गणले  आहे.

  • आस्मानी सुलतान

  • ह्यावेळी शेतात आसमानी सुलतानाने गोंधळच घातलेला आहे .😡😡पाऊस जास्त असल्यामुळे हळदीची बाहेरची पानं पिवळी पडत चालली आहेत .आणि एवढ्या लवकर फुलोराही आला.ह्याचा अर्थ एकच …..आता कंद पूर्णपणे पोसला/भरला जाणार नाही.😢 पाहूया पुढे काय होते ते .!!!!1) इंद्रायणी तांदूळ ….प्रत्येक तोडास     साधारण 15 -16 फुटवे फुटले आहेत     👍👍2)वायगांव हळद.3)  नागालँड चं काळं आलं .  पावसाच्या भर अजून जोरात आहे .   पाहूया किती पीक राहते ते😢😢

  • *अशीही एक कोंकणी पावसाळी रानभाजी*”.शेतावरनं ते-याची पानं व त्यांचे भले लांब देठ मिळाले .माझी ते-याची पानें बिलकुल खाजरी नाहीत.आणि  देठही सुंदर लांब असतात .त्याच्यामुळे  देठांचे आणि पानांचेही वेगवेगळे प्रकार करता येतात.इथे मी ते-याची पानं स्वच्छ धुऊन साधारण 8-10 तास बावण्यास ठेवली.अगदी ताजी पानें त्यांच्या गाठी बांधताना फाटतात.😉आणि देठांचे धागे ओढून काढले .ह्याच धाग्यांचा गाठीं बांधण्यास  उपयोग केला .धागे काढल्यानंतर राहतो त्या मांसळ देठांची  वेगळी भाजी करता येते.गाठीच्या भाजीत ग्रेव्ही (कालवण) आपणास आवडते ती   करू शकतो .ह्यावेळी मी ओला नारळ-लसूण घालून हिरव्या मसाल्याचे कालवण तयार केलं.आणि त्याच्यात मग सारण भरलेल्या गाठीं घातल्या .गाठी़ं मध्ये सारणात मी  हळद मीठ आणि मिरी पावडर लावलेली मोठ्ठाली कोलंबी घेतली.वर ओल्या खोबर्याचे काप ठेवले.व त्यांच्या व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे गाठीं बांधल्या .सारणासाठी आपण काही वापरू शकतो.*खिमा/ चिकनचे तुकडे/ कुठल्याही माशाचें छोटे तुकडे /कुठल्याही आवडत्या भाजीचे छोटे तुकडे /बटाटा/ रताळी/फुलकोबी/पिटुटले मद्रासी कांदे* वगैरे वगैरे.(भाजीच्या अळूचे देठ जरा कापून  त्याची चव बघावी वा जीभेनें कापलेला देठ चोखून पहावा.चव खाजरी निघाल्यास कालवणात जराशी जास्त चिंच/बिलींब /करमलं /कोकम/लिंबू रस/ विनेगर /बेकिंग पावडर /खायचा सोडा वापरावा) .*कालवण अप्रतिम बनतं*.🩷🩷

  • माझी पानवेल म्हणणें,माझं एकच पान पुरे!!!लक्ष्मी स्वरूप बंगाली वधू  नेहमीच मला अत्यंत  भावली आहे .🩷🩷सुंदर रित्या  देवी सारखी सजलेली , चौरंगावर बसलेली,आपली सुंदर नेत्रदृष्टी नागवेलीच्या पानाने झाकणारी वधू जेंव्हा तिचे अत्यंत लाडके भाऊ चौरंगावरून बसवून ,तिला लग्न मंडपात घेऊन  येतात, तेव्हा मित्रमंडळी ,सगळे सोयरे, सर्व गणगोत आनंदात एकच कल्लोळ करतात.🥰🥰लग्न मंडपात वर तर प्रथमच पाटावर उभा असतो.चारही  भाऊ अगदी जपून तिला ,वराभवती फेरी मारत,  अलगद चौरंगावरच वरासमोर  आणतात. आणि प्रथमच ती आपली नागवेलीची पाने बाजूला सारून वराकडे दृष्टीक्षेप टाकते .तोच  हा *शुभो-दृष्टी मुहूर्त*. हाच तो शुभो- दृष्टी मुहूर्त , जेंव्हां वराच्या अत्यंत *दृढ आश्वासक दृष्टीस  वधूची* *मधाळ, स्वप्निल आणि आनंद संसारोत्सुक  दृष्टी मिलाप होतो*.वधू जेंव्हा आपले डोळे झाकून घेते, तिला दोन ते तीन नागवेलींची पानें नक्कीच लागतात. पण माझ्या इथली नागवेल म्हणते माझें *एकच पान पुरे हो*.!!!🤭🤭आपल्या भारतीय वनस्पती शास्त्रात नागवेलीचे पान हे *समृद्धीचे ;सर्जनशीलतेचे,; आनंदाचे; आणि संपूर्ण समर्पणाचे प्रतीक* मानले जाते. जसं कुठल्याही परिस्थितीत साथीस आग ओकणारा *चुना* असो  वा  परिस्थिती निबर करणारा काथ  असो, नागवेलीचे पान जसे आपल्या सुंदर लाल रंगाने जीवन रंगीत करते,.तसेच आपली वधू कुठल्याही परिस्थितीत सासरी सुंदर रंग जीवनात भरू इच्छिते हेच ती नागवेल पानं दर्शवतात.माझ्या इथल्या नागवेलीचे *वाण* काय ते मला ठाऊक नाही .पण प्रत्येक *पान 10″× 5″  आहे .नववधूस  शुभो-दृष्टी मुहुर्तास ,आपले डोळ्या झाकण्यासाठी *एकच पान पुरें हो*.!!!🤭🤭

  • नारळ तेल

    1)+2) गेल्या सात-आठ महिन्यांचे     सुकलेले नारळ  सोलून आंत मधले गोटे     बाहेर काढले …..*(30.5 किलो)*3) खराब नारळ बाजूला काढले.*(4 किलो)*4) मुद्दाम बाजारातून एक सुकलेला नारळ     आणला .    त्याच्या खोबऱ्याची जाडी     *(6-7mm)* निघाली.5) घरचा फक्त गो-अमृतावर वाढवलेला     सुक्या  नारळाच्या खोबऱ्याची जाडी     *(12-13mm)* निघाली.6) घरच्या व बाजाराच्या सुक्या नारळाची      वाटी .7) तेल काढण्यासाठी साफ केलेल्या…

  • शेतातलें कासव

  • शेतातलें कासव

    आमच्या शेतामध्ये कासवं खूप आहेत. भर कोसळत्या पावसांत साठलेले पाणी काढण्यासाठी बांध तोडतांना चुकून कासवाला पाठीस कुऱ्हाड लागली.😢कासवास घरी आणले. वेटर्नरी डॉक्टर त्यादिवशी भेटू शकले नाहीत.कासवाच्या फोटो वरच डॉक्टरांनी ट्रीटमेंट सांगितली.गाईच्या तुपात हळद मिक्स करून त्याचा लेप लावला. खाऊ म्हणून त्यालाचिकन खिमा /सुकी मच्छी /पालक पानें घातली.लेप दिवसातला दोनदा लावला .दोनच दिवसांत कासव छान फिरायला/जेवा-खायला…